
प्रतिनिधी/नाशिक (माय मराठी न्यूज नेटवर्क)


येवला तालुक्यातील भारम येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जेजुरकर यांचे बंधू व हरिभाऊ जेजुरकर यांचे चिरंजीव सिद्धेश जेजुरकर याने भारतामध्ये इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्क येथील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून तंत्रज्ञान व्यवस्थापन विषयात MS ही पदवी मिळवली आहे.
सिद्धेशचे वडील हरिभाऊ जेजुरकर हे पोलिस प्रशासनात आर टी ओ असून त्यांच्या मार्गदर्शनाने सिध्देश ने प्राथमिक शिक्षण नाशिक येथे व त्यानंतर पुढील शिक्षण ठाणे येथे पूर्ण केले. त्याने भारतात इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून दोन वर्षापासून तो न्यूयॉर्कला MS ही पदवी मिळविण्यासाठी गेलेला होता. त्याने आपल्या अथक प्रयत्नांनी आपले स्वप्न साकार केले असून त्याच्या या यशाने आई वडिलांचेही स्वप्न पूर्ण झाले आहे.
सर्वच स्तरातून आज सिद्धेशचे कौतुक होत आहे. आज एका छोट्याश्या गावातील मुलाने एवढे मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे भारम गावातील सर्व ग्रामस्थ व नातेवाईक व कुटुंब अतिशय आनंदी आहेत. सिद्धेशला मित्र परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.




