- महाराष्ट्र शासनाने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात वडगाव उत्तर व वडगाव दक्षिण या दोन्ही गावांत सार्वजनिक ठिकाणांची फवारणी करून निर्जंतुकीकरन केले होते. यामुळे कोरोनाचा विषाणु रोखण्यास मदत होऊ शकली. दक्षिण व उत्तर दोन्ही वडगावांत आरोग्य विभागामार्फत प्रत्येकी चार ते पाच वेळा मोफत कोरोना तपासनी शिबिरे आयोजीत केली गेली. तपासणीमुळे वेळीच कोरोना संक्रमित रुग्णांचे निदान होऊन विलगीकरनात राहण्याच्या सुचना केल्यानेे कोरोना आटोक्यात आनण्यास मदत झाली.
सर्वात प्रथम वडगांव दक्षिणसाठी भोसे येथे ५० लसी व नंतर वडगांव उत्तर येथे ५० लसींची उपलब्धता गांवकऱ्यांसाठी करण्यात आली. त्यानंतर आजही दररोज आरोग्य विभागामार्फत जास्तित जास्त १० लसी उपलब्ध केल्या जातात. यामधुन दोन्ही वडगांवमधुन सुमारे २०० जनांचे आसपास लसीकरन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक होते. त्यानुसार ग्रामस्थांनीही सहकार्य करत शहराच्या ठिकाणी जायचे टाळले. परंतु लॉकडाऊन उठवल्यानंतर शेती खरेदीसाठी, आवश्यक कपडे, कटींग व इतर कामासाठी गांवकरी बाहेर जाणार हे ओळखुन ग्रामपंचायतीनं दोन्ही गावांत एकुण १ooo मास्क, ५oo सैनिटायझर बाटल्या व ५oo डेटॉल साबन असे प्रत्येक घरी दोन मास्क, सॅनिटायझर, डेटॉल साबन व कोरणा संबंधी जागृती पत्रक वाटले. स्वतःसह कुटुंबाची योग्य काळजी घेतील व कोरोना विषाणुच्या संक्रमणांस आळा बसेल.
त्याचबरोबर वडगांव दक्षिण येथे राजमुद्रा ग्रुपच्या माध्यमातुन सुमारे १५०/- मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांचा फायदा वेळीच कोरोना संक्रमित रुग्न ओळखायला व त्याला वैयक्तिक नोटीस देऊन विलगीकरनात ठेवण्यात मदत झाली. अशारीतीने आपण वडगांव मध्ये जवळ-जवळ सर्व रुग्नांची वेळीच कोरोनामुक्ती करू शकतो. यामध्ये दक्षिण वडगांव मधील दोघांना व उत्तर वडगांव मधील दहा-आकरा जनांना गमावल्याची खंत मनामध्ये कायमची राहील. अशा रीतीने वडगांव ग्रां.पं. सक्षमपणे काम करत आहे व यापुढेही करत राहील अशी ग्वाही सीए लहू काळे यांनी दिली. कोरोना संपला नाही त्यामुळे प्रत्येक गांवकऱ्याने बाहेर पडताना मास्क वापरून वेळोवेळी पाण्याने व आवश्यकतेनुसार सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि कमित कमी लोकांशी संपर्क ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.






Somebody essentially assist to make significantly articles I would state. This is the very first time I frequented your website page and up to now? I amazed with the analysis you made to make this actual put up amazing. Great job!