-->
राज्यविशेष

वडांगळीत गांधी-शास्त्री जयंतीसह एकात्मिक बाल विकास सेवा दिन उत्साहात

स्वच्छता, पोषण, आरोग्य व बालसंवर्धनाबाबत जनजागृती; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

 

प्रतिनिधी l सिन्नर (माय मराठी न्यूज)

 

वडांगळी (ता. सिन्नर) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच एकात्मिक बाल विकास सेवा दिन आणि सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने वडांगळी ग्रामपंचायत व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. ‘स्वच्छता ही सेवा २०२६ – एक दिवस, एक तास, एक सोबत’ अभियानांतर्गत महाश्रमदान करण्यात आले. यावेळी पोषण आहाराचे प्रात्यक्षिक, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम व जंक फूडविरोधी जनजागृतीपर नाटिका सादर करण्यात आली.

‘पहिले पाऊल’ व ‘वेलकम मेळावा’, अन्नप्राशन, गरोदर व प्रसूत मातांना बेबी किट वाटप, बालकांचा वाढदिवस, हात धुण्याचे प्रात्यक्षिक, आकार कुशल (School Readiness) प्रमाणपत्र वितरण तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रताप पाटील, गटविकास अधिकारी अशोकराव भवारी, माजी सरपंच नानासाहेब खुळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सहाणे, नवनियुक्त प्रशासक तथा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) निलेश भुजाळ, विस्तार अधिकारी विजय पचलोरे, कृषी विस्तार अधिकारी गोसावी, मुख्याध्यापक झाडे सर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामस्थ आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता होलगडे व ब्लॉक कॉर्डिनेटर सचिन सर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी वडांगळी अंगणवाडीच्या कार्यकर्त्या गीता ताई यांनी बालविकास, पोषण, जनजागृती आणि लोकसहभागातून केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले. कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छता, पोषण, आरोग्य आणि बालसंवर्धनाबाबत जनजागृती झाली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close