-->
मनोरंजन

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ‘वो तेरे प्यार का गम’ प्रेक्षकांच्या भेटीला

Amrita Fadnavis' new song 'Wo Tere Pyaar Ka Gham' is in the audience

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ असे या गाण्याचे नाव आहे. 

 

 

‘माय लव्ह’ चित्रपटातील रिक्रिएट व्हर्जन

अमृता फडणवीस यांचे ‘वो तेरे प्यार का गम’ हे नवं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या गाण्याला दोन मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘माय लव्ह’ या हिंदी सिनेमातील ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं आहे. आता या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन अमृता फडणवीस यांनी गायले आहे.

 

 

‘सारेगम’ या युट्यूब चॅनलवर ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस स्वतः हे गाणं गाताना दिसत आहेत. या गाण्याचे टीझर लाँच झाल्यापासून अमृता फडणवीस यांच्या गाण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता होती.

 

‘जब दिल टूटता है तो आवाज होती है’ असं म्हणत अमृता फडणवीसने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. माय लव्ह सिनेमातील ‘जब दिलटूटता हैतो आवाज होती है’ हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिले होते. तर मुकेश यांनी गायलं होतं. पण आता या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. नेटीझन्सनी या गाण्यावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close