-->
करमाळाराजकिय

मकाईची निवडणूक टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा अनागोंदी कारभार; आदिनाथच्या दाखल्यावर मकाईचा शिक्का

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मकाई कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यात विरोधकांनी 17 पैकी 16 जागेवर उमेदवारी फॉर्म भरले असून रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने या निवडणुकीत नवनवीन ट्विस्ट येत आहे.

 

आज मकाई कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये सत्ताधारी बागल गटाने विरोधी उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद करण्यासाठी अनेक उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर तसेच सूचक व अनुमोदक यांच्यावर हरकत घेतली.

 

विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी सत्ताधारी गटाने नवीनच शक्कल लढवली. यामध्ये आदिनाथ कारखान्याची थकबाकी दाखवण्यासाठी वापरलेल्या आदिनाथ कारखान्याच्या लेटर पॅड वर मकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाचा शिक्का मारून त्यावर आदिनाथ कारखान्याच्या कार्यकारी संचालकाचे नाव व सही आहे. यावरून निवडणूक टाळण्यासाठी सत्ताधारी बागल याचा अनागोंदी कारभार दिसून येत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आजिनाथचा दाखला व त्यावर मकाईचा शिक्का याची जोरदार चर्चा सुरू होती.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close