-->
करमाळामाहिती विषयक

गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा १३ व १४ एप्रिल रोजी होणार- राजुकाका शियाळ

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानची यात्रा दिनांक १३ ते १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यात्रा कालावधीमध्ये सर्व भाविक भक्तांनी यात्रेत उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने राजूकाका शियाळ यांनी केले आहे.

 

गुळसडी येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथ यात्रा दि. १३ एप्रिल रोजी सुरू होणार असून पहाटे चार वाजता देवाचा विवाह, सकाळी आठ वाजता अभिषेक, दहा वाजता सवाद्य कावड मिरवणूक, संध्याकाळी साडेआठ वाजता शेरनी व साडेअकरा वाजता छबिना निघणार आहे. तसेच दि. १४ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता काळ भैरवनाथाची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नंतर दुपारी तीन वाजता कुस्त्याचा जंगी आखाडा आयोजित केला आहे.

 

गुळसडी पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच करमाळा तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी. असे आवाहन काळ भैरवनाथ यात्रा कमिटी व समस्त गुळसडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close