
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे हे शेतकरी हिताचे योग्य निर्णय घेतात हे कर्ज ते स्वतः फेडणार आहे त्यांनी जबाबदारी घेतली आहे विरोधकांनी कोल्हेकुई करू नये असे सेलजोडे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनराव बदे यांनी विरोधकांना मारले आहे.


यावेळी पुढे बोलताना वामनराव बदे म्हणाले की सध्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी तालुक्यातील सर्व शिंदे गटाचे विरोधक राजकीय बोंब मारत आहेत त्यांनी प्रथम पुर्वी स्वताः जे कारखाने चालवले आहेत व चालवत आहेत त्यांनी काय दिवे लावलेत हे तालुक्यातील सर्व जनतेला माहीत आहे.आणि ते त्यांनी उघडया डोळयाने पाहिले आहे, म्हणुनच जनतेने त्यांना घरी बसवले . त्यामुळे रिकामी उठाठेव करून आणि उणेदुणे काढून शिंदेंचे काही वाकडे होणार नाही. ज्यांनी आता सध्या तालुक्यातील कारखाने डबघाईला आणले आहेत त्यांनी तर चकार शब्द काढु नये.
आमदार शिंदे यांनी तालुक्यात अनेक रस्ते, आरोग्य उपकेंद्र, शाळा खोल्या तसेच बहुसंख्य ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे विरोधकांनी आता २०२४ ला आमदारकीचे स्वप्न सुध्दा पाहु नये.
यावेळी वाशिंबेचे तानाजी झोळ, राजेंद्र पवार, विट चे सरपंच उदय ढेरे व उमरड गावचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
…



