माय मराठी न्युज


आगामी काळात संजयमामा शिंदेंचे नव्हे तर नारायण पाटलांचे राजकीय भविष्यच नाही तर अस्तित्वच संपलेले दिसेल. मामांच्या राजकीय भविष्यांची काळजी करणारांना जेऊर ग्रामपंचायतीचा रस्ता पार करणे देखील कठीण आहे हे वास्तव स्विकारावे.
करमाळा मतदार संघातील ५ ते १० % राजकीय गटतट व पक्षाशी संबंधीत कार्यकर्ते सोडले तर खऱ्या अर्थाने मतदार असलेल्या नागरीकांचा कानोसा घेतल्यास संजयमामा शिंदे यांचे कामाबाबत सर्वसामान्य जनता अत्यंत समाधानी असल्याचे चित्र आहे. विश्वास नसल्यास सर्व्हे करणाऱ्या एखाद्या एजन्सी कडून सर्वे करून अहवाल मागवावा, सत्य समजेल. संजयमामा शिंदे करमाळा तालुक्याचे आमदार झालेपासून नव्हे तर २०१४ पासूनच मामांनी कामातून त्यांची ओळख तयार केली. जिल्हा परीषद अध्यक्ष झालेनंतर तर त्यांनी सर्वाधीक विकास निधी करमाळा तालुक्यासाठी आणला. त्यावेळी त्यांच्यावर करमाळ्यासाठी देणाऱ्या निधीमुळे जिल्हा भरातून टीका होत होती. परंतु टिकेचा विचार न करता संजय मामांनी विकास निधीचा बॅकलॉग भरून काढला आहे. आमदार शिंदे यांच्या कार्याने प्रभावीत होवून माजी आ. पाटील गटातील कार्यकर्ते आ. शिंदेंकडे आकृष्ट होऊ लागल्याने विरोधक बेछूट वक्तव्य करू लागले आहेत. वास्तविक गटा तटाच्या राजकीय दलदलीला प्रोत्साहन न देता मामांनी फक्त कामालाच महत्त्व दिले आहे.
आमदार झाले नंतर सर्वप्रथम पाणी, रस्ते, आरोग्य, वीज या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत शासनदरबारी दर आठवड्याला २ ते ३ दिवस मुंबई येथे थांबून विकासकामे मार्गी लावत असलेचे चित्र आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा विषय असो अथवा कुकडी योजतेतून मांगी येथे पाईपलाईन व्दारे पाणी आणणेची योजना असो, सातत्याने पाठपुरावा करत या योजना मार्गी लावल्या आहेत. कृष्णा खोरेच्या माध्यमातून दहिगाव योजनेचे ३ ते ४ वेळा लाखो रुपये वीज बील भरले. साडे, घोटी ते लव्हे पासून पूर्व भागातील सर्व गावांमधे दहिगावचे पाणी प्रथमच पोहोचवले. दहिगाव व कुकडीची आवर्तने नियमीतपणे सोडली. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या टेंभुर्णी – नगर रस्त्याचे काम NHAI कडे सोपवून पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आ. शिंदे प्रयत्नशील आहेत. पुणे नगर व सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना दळणवळणासाठी महत्वाच्या अशा डिकसळ पुलाला शासकीय मान्यता व निधीची तरतूद केली. गेल्या २ वर्षात सर्वांना भेडसावत असलेल्या कोरोना महामारीच्या काळात सर्वाधीक निधी आणून खर्च करून सुविधा देण्यात आ. संजयमामाचा क्रमांक जिल्ह्यात अग्रस्थानीआहे. कुटीर रुग्णालय करमाळा येथे सिझेरीयन सुविधेपासून, ॲम्ब्युलन्स ते विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. जेऊर येथील हॉस्पीटल कार्यान्वीत केले. आरोग्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत करमाळाच नव्हे तर जिल्ह्याला सर्वाधीक लसीचा पुरवठा उपलब्ध करून दिला. अखंडीत वीजपुरवठ्यासाठी नवीन सबस्टेशनला मान्यता मिळवली. गेली कित्येक वर्षे प्रलंबीत असलेल्या करमाळा MIDC च्या पायाभूत सुविधेसाठी निधी व प्रस्तावांना मंजूरी मिळवून लवकरच हि कामे कार्यान्वित होतील. जिल्हाधिकारी सोलापूर यांचेसमवेत सतत बैठका लावून तालुक्यातील पुनर्वसन भागातील भुसंपादन, मोबदला व पायाभूत सोयी सुविधांचे प्रश्न सोडविले. करमाळा तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्यामुळे मामांनी त्यांचे व आ. बबनदादांच्या कारखान्यामार्फत तालुक्यातील ऊस उत्पादकांना व वाहन धारकांना न्याय दिला. आ. संजयमामा शिंदे यांनी हि सर्व विकास कामे करीत असताना विधानसभा सदस्यांची कर्तव्ये म्हणून पार पाडली.
केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय लाटत स्वतःला नारायण पाटील यांचेसारखे रोडकिंग म्हणून उपाधी लावत फिरले नाहीत. स्वतःच्या गावात पाणी न आणू शकणारे पाटील स्वतःला पाणीदार म्हणवतात, यासारखे दुर्दैव ते कोणते. आ. शिंदे यांना राजकारण करत राजकीय दबदबा दाखवायचा असता तर आदिनाथ कारखान्याचे १२ संचालक जे शिंदे गटात प्रवेशाला इच्छुक होते त्यांना प्रवेश देत मोठा प्रसिद्धीचा गवगवा करू शकले असते. परंतु गेल्या २ वर्षात आ. संजय मामांनी फोडाफोडी चे अथवा गटातटाचे राजकारण न करता फक्त विकास कामालाच प्राधान्य दिल्यामुळे सर्वच गटाचे कार्यकर्ते मामांकडे जात आपली कामे करून घेत आहेत. मतदारसंघात असताना आ. संजयमामा सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जनतेसाठी उपलब्ध असतात. मतदारसंघातील नागरीकांच्या सुख दुःखात सहभागी झाल्याचेही दिसते.
करमाळा, निमगाव, कुर्डूवाडी, कारखाना, सोलापूर येथील संपर्क कार्यालयात कामे घेवून आलेला सामान्य नागरीक कधीही निराश होवून परत जात नाही. आ. संजयमामा शिंदे हे सातत्याने जिल्हाधिकारी, सीईओ, एसपी, जिल्हा उपनिबंधक, प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार, बीडीओ, अभियंता, मुख्याधिकारी, सहा. निबंधक आदी अधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवून तालुक्याच्या विविध विकास योजना, संबंधित प्रस्ताव, कायदा व सुव्यवस्था याबाबत जागरूक असल्यामुळेच करमाळा विधानसभा मतदारसंघ विकास कामात जिल्ह्यात अग्रभागी असल्याचे दिसत आहे. आ. संजयमामा शिंदे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचे असलेले भक्कम पाठबळ, शासनदरबारी असलेली त्यांचे शब्दाला किंमत, त्यामुळे विरोधकांनी संजयमामांच्या राजकीय भविष्याची काळजी करत बसण्यापेक्षा तालुक्यातील जनतेच्या मनातून आपण विस्मरणात जावू नये याची काळजी घेतली तरी पुष्कळ…
ही पोस्ट व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.



