-->
विशेष

माणकी येथे शंकरराव रणनवरे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

 

माळशिरस/प्रतिनिधी

 

प्रतिकुल काळात परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन जीवनाच्या प्रवासात शिक्षकी पेशा स्विकारून आज तालुकात अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे अनमोल कार्य शंकरराव रणनवरे सर यांनी कलेले आहे. असे उद्गार जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. जी माणसे आयुष्याच्या प्रवाहात सतत राहतात अशीच माणसे जीवनाच्या प्रवासात सतत आनंदी व समाधानी असतात असे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले.

 

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखेतून उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले शंकरराव अनंतराव रणनवरे सर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस माणकी (ता.माळशिरस) येथील ‘राजगड’ या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमासाठी सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद सदस्य आ. रणजितसिंह मोहिते पाटील, अकलुज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. के. इनामदार, पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिरीष रणनवरे यांनी केले. सुत्रसंचालन पोपटराव पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश रणनवरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक वर्ग, तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स, माणकी पंच‌‌क्रोशीतील मान्यवर व रणनवरे परिवारांचे नातेवाईक व मित्र परिवार यांची उपस्थिती लक्षणीय होती.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close