
करमाळा/प्रतिनिधी


पारेवाडी (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी श्री पांडुरंग नवले व हनुमंत नवले यांचे वडील कै. तुकाराम मारुती नवले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पारेवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिरात ६३ जणांनी रक्तदान करून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
पारेवाडीतील प्रगतशील शेतकरी व वारकरी संप्रदायाचे उपासक तुकाराम (नाना) मारुती नवले यांचे वर्षभरापूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव सरपंच प्रतिनिधी हनुमंत नवले व पांडुरंग नवले यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निश्चय केला. या प्रसंगी करमाळा येथील श्री कमलाभवानी ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात एकूण ६३ जणांनी रक्तदान केले. याच वेळी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन ही संपन्न झाले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रविंद्र नवले, नवनाथ चव्हाण, गणेश गुंडगिरे, सुहास मोहिते, संतोष शिंदे, हनुमंत नवले, पांडुरंग नवले आदी युवकांनी परिश्रम घेतले.



