-->
राजकियविशेष

पिंपळनेर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचे दोन उमेदवार विजयी 

 

माढा/प्रतिनिधी

 

पिंपळनेर (ता. माढा) येथील पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या पिंपळनेर ग्रामपंचायत निवडणुकीत छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पाटील पॅनल बरोबर आघाडी करून स्वराज्य संघटनेचे दोन उमेदवारांनी वार्ड क्र. एक मधून सौ. पल्लवी राहूल गोडसे आणि अभिजीत सारंगधर काशिद यांनी निवडणुक लढवली होती. त्यामध्ये सौ. पल्लवी राहूल गोडसे या ११५ मतांनी आणि अभिजित सारंगधर काशिद हे १५३ अशा भरघोस मतांनी निवडून येत पिंपळनेर ग्रामपंचायतीत स्वराज्य संघटनेला पहिले यश मिळवून दिले आहे. शिवस्मारक समिती पिंपळनेर यांनी स्वराज्य संघटनेला पूर्ण पाठींबा देत विजयात महत्वाचे योगदान दिले.

 

या निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटनेसाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष सुधाकर लोंढे सर, सुनिल पाटील, विवेकानंद लोंढे, आमोल पाटील, उमेश साडेकर, अमर पाटील, सुरज लोंढे, रूपेश सरकाळे, विशाल लोंढे, कपिल वाघमारे तसेच बबन पाटील, मन्सूर आतार, सुनील लोंढे, रणजीत कांबळे, रामलिंग कांबळे, बापू काशीद, विक्रम काशीद, पांडुरंग फुगे, रोहन गोडसे, शुभम कापरे, विश्वजित पाटील, अमित जठार, महादेव जठार गुरूजी आणि स्वराज्य संघटनेचे माढा तालुका उपाध्यक्ष आयाजभाई जकाते आणि स्वराज्य संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पल्लवी राहूल गोडसे यांनी कार्य केले. तसेच यासाठी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close