-->
Uncategorized

वकीलीसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातही वकीलांनी आपला वेगळा ठसा उमटवावा- ॲड. डॉ. बाबुराव हिरडे

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲड. अजितराव विघ्ने यांना नुकताच सकाळ वृत्त पत्र समुहाकडुन सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त करमाळा वकील संघाकडुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ व ज्युनिअर वकील मंडळी कडुन ॲड. विघ्ने यांच्या सामाजिक, राजकीय व वकीली क्षेत्रातील कामाबद्दल तसेच त्यांच्या चिकाटी बद्दल कौतुक करण्यात आले.

 

या प्रसंगी बोलताना ॲड. बाबुराव हिरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व वकील बांधवांनी आपल्या वकीलीसह तालुक्याचे राजकारण व समाजकारण यात सक्रीय सहभाग नोंदवुन नेतृत्व करावे अशी भावना व्यक्त केली. आभार प्रदर्शन सचिव अँड. योगेश शिंपी यांनी केले.

 

 

यावेळी ॲड. बाबुराव हिरडे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. राहुल सावंत, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. महादेव कांबळे, करमाळा वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. विकास जरांडे यांची भाषणे झाली. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ एन. डी. रोकडे, एस. पी. रोकडे, बी. टी. देवी, ॲड. सौ. लता पाटील यांचे सह सर्व वकील मंडळी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close