-->
Uncategorized

वाशिंबे येथे स्व. जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पशुसंवर्धन शिबिर संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

वाशिंबे (ता.करमाळा) येथे देशभक्त स्व. जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या स्मृतीदिना निम्मित शुक्रवार दि. ०२ सप्टेंबर रोजी जे.के. फाउंडेशन तर्फे अमोल भोईटे यांनी पशुसंवर्धन विभाग करमाळा यांच्या मार्फत जनावरांसाठी लशीकरण शिबीर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रतिमेचे पुजन करून आलेल्या मान्यवरांनी विन्रम अभिवादन केले.

 

सदर कार्यक्रमावेळी करमाळा पंचायत समितीचे पशुसंर्वधन विकास अधिकारी तसेच नेते नवनाथ बापू झोळ, भाजपचे युवा नेते अमोल पवार, ह.भ.प. माऊली महाराज झोळ, ह.भ.प. आप्पा महाराज राऊत, रामदास बप्पा झोळ यांनी भोईटे गुरुजी यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले.

 

यावेळी डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ, यादव सर, शिंदे सर, नानासो झोळ, अजित झोळ, किरण झोळ, सुभाष झोळ, संदिप झोळ, अशोक वाघमोडे, अकुंश यादव, प्रशांत पवार व करमाळा तालुक्यातील सर्व पुशधन डॉक्टर टिम उपस्थित होते. यानंतर वाशिंबे गाव, परिसर व शिवारातील बैल, गाई, शेळ्या असे घटसर्प २०० लस व औषधोपचार देण्याची मोहिम राबवण्यात आली.

 

यावेळी डॉ. मंगेश तुकाराम झोळ यांची सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन सचिन भोईटे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close