-->
Uncategorized

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

 

केम/प्रतिनिधी

 

केम (ता. करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस. बी सर‌, पर्यवेक्षक सांगवे सर यांच्या हस्ते हिंदी विषय शिक्षक कोंडलकर पी.डी सर, कुंभार मॅडम, एस. एम घुगे‌ सर, जी. के जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला.

 

हिंदी‌ आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून सर्वांनी हिंदी भाषेचा‌ वापर केला पाहिजे. असे मत हिंदी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक पी. डी कोंडलकर सर यांनी यावेळी व्यक्त केले. एस.एम घुगे सर‌ यांनी हिंदी विषयाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच जी. के जाधव सर‌ यांनी ‘कदम मिलाकर चलना होगा‌’ हि कविता सुरात म्हणून उपस्थितांचे मने जिंकली.

 

हिंदी दिन विषयी विद्यार्थ्यांनी सुरेखपणे आपली भाषणे सादर केली. हिंदी दिनाचे सूत्रसंचलन पी. डी. कोंडलकर सर यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख के. एन‌ वाघमारे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close