-->
Uncategorized

वाशिंबे येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या निधीतून मंजूर कामांचे भूमिपूजन

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून मौजे वाशिंबे येथील विविध विकास कामांसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवार दि. ८ मार्च रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

या विकास कामांमध्ये केत्तुर सोगावं रस्ता ते गौतम रंदवे घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे यासाठी रु. १० लाख, वाशिंबे येथील मज्जिद समोर सभा मंडप बांधणेसाठी रु. १० लाख,

वाशिंबेतील रेल्वे लाईन ते संजय गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणेसाठी रु. ५ लाख, रेल्वे पूल ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण करणेसाठी रु. ५ लाख तसेच वाशिंबेतील हायस्कूल ते रामचंद्र पाटील वस्ती रस्ता खडीकरण करणेसाठी रु. ५ लाख आदी कामांचा समावेश आहे.

 

या भूमिपूजन प्रसंगी वाशिंबे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close