वकीलांचे व्हॉटस्-ॲप ग्रुप मुळे अपघातग्रस्त वकीलांना मिळाली तातडीची मदत
माय मराठी न्यूज नेटवर्क


बीड जिल्ह्यातील मौजे आष्टी, (ता.आष्टी) येथील विधिज्ञ ॲड. रमेश वनवे हे पुणे येथिल शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टीस करतात. त्यांचा मंगळवार दिनांक १७ मे २०२२ रोजी पुणे येथील औंध परिसरात अपघात झाला होता. यावेळी तात्काळ काही वकील मंडळी तसेच ॲड. टेकावडे व वकील मंडळींनी त्यांचा अपघात झालेची बातमी वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप वर शेअर केली.
ॲड. रमेश वनवे यांच्या या अपघाताची बातमी ॲड. टेकावडे यांनी करमाळा तालुका बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने यांना कळविली. त्यांनी लगेच त्यांचे आष्टी येथील वकील मित्र ॲड. किशोर मुळे यांना सदर अपघाताची माहिती कळवताच ॲड. मुळे यांनी आष्टी तालुका बार असोसिएशनच्या सर्व विधिज्ञ व्हॉट्स ॲप ग्रुपला या अपघाताची माहिती कळवुन अपघातग्रस्त ॲड. वनवे यांचे नातेवाइकांना कळविले. यानंतर ॲड. वनवे यांचे आई, वडील व नातेवाईक यांनी तात्काळ पुणे येथील हॉस्पिटल गाठले. ॲड. वनवे यांच्यावर ऊपचार चालु असुन त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
सोशल मिडीयाचा असाही चांगला उपयोग होऊ शकतो.
एका व्हॉटस ॲप ग्रुप मुळे एखाद्याचे प्राण वाचावे यापेक्षा काय पाहीजे. वस्तुतः आपण सोशल मिडीयाला नावे ठेवतो. परंतु, सोशल मिडीयाचा असाही चांगला वापर होऊ शकतो. अशा चांगल्या गोष्टीसाठी मिडीयाचा वापर व्हायला पाहीजे. कुठला माणुस कधी, कसा, कोणाच्या मदतीला येईल सांगता येत नाही. परंतु, हे सर्व एका व्हॉटस् अप ग्रुपमुळे आणि साध्या मेसेजमुळे घडते ही नक्कीच डिजिटल क्रांती आहे.
ॲड. अजित विघ्ने, अध्यक्ष, करमाळा तालुका बार असो.




