कमळ चिन्हावर उमरड पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार- दादासाहेब देवकर
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर यांचा वाढदिवस वरकटणे (ता.करमाळा) येथील सर्व मित्र परिवारांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी दादासाहेब देवकर यांनी मी उमरड पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की, तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावोगाव भेटीगाठी घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम येणाऱ्या काळात करणार आहे. तसेच उमरड पंचायत समिती गणातील प्रत्येक गावोगाव केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबविता येतील त्या त्या योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष गणेश भाऊ हे उपस्थित होते.
येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर किंवा युतीतुन लढवणार आहे. दादासाहेब देवकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी सर्वशक्तीनिशी उभा राहणार असल्याचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले.
यावेळी वरकटणे येथील विकास सोसायटीचे चेअरमन शरद देवकर सर, सरपंच बापू तनपुरे, तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष आण्णासाहेब देवकर, रायगावचे चेअरमन दासाबापु बरडे, विशाल साळुंखे, उमरडचे शहाजी चौधरी, आण्णा पडवळे, अंजनडोहचे हनुमंत रणदिवे, झरे गावचे चेअरमन सोमनाथ घाडगे, गणेश जाधव, कोंढेज ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लोंढे, सरपडोहचे मगन भिताडे, रोहित चौगुले, बाळू वाकळे, महादेव नरवडे, पांडुरंग घोगरे, रवी देवकर, संजय तनपुरे, सागर पाटील, विशाल पाटील, प्रशांत पाटील, दत्ता आहेर, आप्पासाहेब देवकर, रमेश पाटील, रणजित देवकर, समाधान मस्कर, रमेश मस्कर, धनंजय देवकर, सतिष टांगडे, नवनाथ गायकवाड, तुषार तनपुरे तसेच वरकटणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.




