-->
Uncategorized

वढू बुद्रुकचा विकास जागतिक दर्जाचा करणार :- आमदार अशोक पवार

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

वढू बुद्रुक ता. शिरूर व श्रीक्षेत्र तुळापूर येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला असून या ठिकाणचा विकास हा जागतिक दर्जाचा होणार असून वढू गावाने एक चांगला आदर्श असून सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने गावचा विकास चांगल्या रीतीने होईल असे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

 

 

वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री क्षेत्र बुद्रुक सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार व आमदार अशोक पवार यांची पुणे छत्रपती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समाधी संचालक पदी सर्वात जास्त मतांनी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सांगत करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमावेळी उपसभापती सविता पऱ्हाड, खरेदी विक्री संघाचे राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, सरपंच सारिका शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, राजेंद्र आहेर, साहेबराव भंडारे, संजय भंडारे, योगेश आरगडे, अनिल शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, ग्रामसेवक शंकर भाकरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटी बिनविरोध करण्यासाठी राजेंद्र नरवडे, प्रफुल्ल शिवले, राजाभाऊ आहेर, महादेव भंडारे, अंकुश शिवले, योगेश आरगडे, उत्तम भंडारे, सचिन भंडारे,  अशोक भंडारे, सोमनाथ भंडारे यांनी प्रयत्न केले.

 

 

विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रफुल्ल काळुराम शिवले, संतोष शिवले, आनंदा शिवले, कांताराम आरगडे, संभाजी भंडारे, संपत भंडारे, अंकुश भंडारे, रंगनाथ भंडारे, जालिंदर हरिभाऊ शिवले, अर्चना शिवले, रत्नमाला आरगडे, बळीराम गायकवाड, काळुराम गोसावी यांची बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा व सोसायटी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणारे खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र नरवडे यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दरेकर यांनी तर आभार उपसरपंच हिरालाल तांबे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close