-->
करमाळामहिलाविषयक

अभिनव विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

  

 

अभिनव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिंबे ता. करमाळा येथे ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती इंदुबाई झोळ व अध्यक्ष म्हणून प्रायमरी विभाग प्रमुख श्रीमती अनिता जाधव, संस्था अध्यक्ष आबासाहेब झोळ व प्राचार्य रणजित कादगे सर उपस्थित होते.

 

 

यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

 

 

यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. पंकज शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचा इतिहास व मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल दौंड व कु. प्रतिक्षा कोकरे या विद्यार्थ्यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पंकज शिंदे सरांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री. प्रमोद हाराळे सर, श्री. गोरख गुलमर सर, प्रा. मंगेश साखरे सर, प्रा. दामाजी शेळके सर, प्रा. यश पवार सर, प्रा. उमेश सांगळे सर व प्रा. पंकज शिंदे उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close