वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांमधील आत्मविश्वास वाढून त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध उपक्रम, दुचाकी रॅली, आरोग्य शिबीर तसेच विविध पदावर कार्यरत असलेल्या महिलांची जनजागृती पर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन महिलांच्या वतीने करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र ते अष्टापुर फाटा या मार्गावर महिलांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. याला महिला वर्गाने मोठा प्रतिसाद देत तब्बल १०० पेक्षा जास्त महिला या रॅली मध्ये सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी महिला एकीकरण व इतर महिलांच्या हक्कावर जनजागृती केली. तर डॉ. शीतल गायकवाड यांनी महिलांना व येथील हायस्कूलच्या विद्यार्थिनींना “गुड टच बॅड टच” या विषयावर ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान दिले. तर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पवार यांनी महिलांना स्व रक्षणाचे धडे देत मुलींनी व महिलांनी कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जावे तसेच कधीही मदत लागली तर पोलीस मदतीला असतील अशी ग्वाही यावेळी आपल्या व्याख्यानात दिली.
पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विविध प्रकारच्या महिलांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरात परिसरातील तब्बल ३६५ महिला व मुलींनी सक्रिय सहभाग नोंदवला या महाआरोग्य तपासणी शिबिरात डॉ. दीपक गिरी, डॉ. रामदास शिंगाडे, डॉ. सायली जगताप, डॉ. वरून टोमके, डॉ. सागर शिंदे यांनी आरोग्य तपासणी केली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे , सरपंच दीपक गावडे, माजी उपसरपंच सुरेखा भोरडे, कार्यक्षेत्रातील इतर सरपंच, पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. हरीश लोहार, डॉ. करुणा जगताप, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. महेश वडदरे, डॉ. अनघा शेटे, डॉ. प्रीती शिंगणे, डॉ. वर्षा जगदाळे, ऋतुजा कांबळे, आरोग्य सेवक दयानंद वाघमारे, युवराज चव्हाण, राजेश शेगोकार, आरोग्य सेविका अनुसया लांडगे, प्रज्ञा सावंत, केशर पाटोळे, प्रमिला शितोळे, रोहिणी बिरंगर, अश्विनी कोतवाल, सुनीता आरगडे, मनीषा गुरव, मोहिनी महामुनी, रश्मी गावडे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका गट प्रवर्तक जयश्री शिंदे, स्नेहा लवांडे, शकीला शेख, माधवी मेडकर, मंजुषा शिंदे, मनीषा भालेकर, राणी दातार, सुनीता निकाळजे, मनीषा निकाळजे, पूजा काशीद, राणी दौंडकर, सुनीता भोरडे, उज्वला कुंभार, वैशाली बनसोड यांच्यासह आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले.



