उमरड व मांजरगाव येथील शेतकऱ्यांचा सार्व. बां. वि. कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील उमरड व मांजरगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कुंभेज फाटा ते बाभूळगाव रस्त्यासाठी संपादित झाल्या असून या दोन गावातील शेतकऱ्यांना अद्याप वारंवार मागणी करूनही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. यामुळे रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मोबदला दिला नाही तर १७ तारखेला सर्व शेतकरी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय करमाळा येथे अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनावर श्रीनिवास रामेश्वर पाटील, श्रीरंग केरु चौधरी, सुभाष केरु चौधरी, चंद्रकांत यशवंत भिल, रमेश तुकाराम गोडगे, नवनाथ केरु चौधरी, सतीश भानुदास चौधरी, चंद्रशेखर यशवंत पाटील, सदाशिव बाबा बदे, सुनिल हरिदास चौधरी, प्रकाश तुकाराम गोडगे, धनवंत यशवंत पाटील, आदि शेतकऱ्यांच्या सहया आहेत.




