शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा श्री व्यंकटेश मल्टिस्टेटतर्फे सन्मान
करमाळा शाखेत उत्साहात विशेष कार्यक्रम; गुरुवर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

प्रतिनिधी I करमाळा (माय मराठी न्यूज)

शिक्षक दिनानिमित्त श्री व्यंकटेश मल्टिस्टेटच्या करमाळा शाखेत ८ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी श्री. अण्णासाहेब जगताप महाविद्यालय, करमाळा येथील सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी आदरणीय गुरुवर्य श्री. रमेश कवडे सर, श्री. सौदागर शेळके सर, श्री. पांडुरंग वीर सर, श्री. दिवाण सर, श्री. भस्मे सर, श्री. किरवे सर आणि श्री. खान सर यांची उपस्थिती होती. या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा श्री व्यंकटेश मल्टिस्टेटच्या वतीने सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांचे हे योगदान समाजासाठी मोलाचे असून, त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान श्री व्यंकटेश मल्टिस्टेटच्या विविध योजना, ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा शाखेचे शाखाधिकारी श्री. अजय चव्हाण, सेल्स ऑफिसर श्री. नितीन शिंदे, तसेच श्री. छगन ओहोळ, श्री. ऋषिकेश ठोसर, श्री. ऋषिकेश थोरात, श्री. राजेंद्र सूर्यवंशी आणि श्री. सिद्धेश्वर स्वामी यांनी विशेष योगदान दिले.




