-->
देशराज्य

डिजिटल मीडिया पत्रकारांना न्याय देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून संघटनेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री Pramod Sawant यांनी दिली. तसेच, यासंदर्भात पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडे निवेदन सादर करण्यासाठी आपण सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोवा येथील कला अकादमी येथे अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे समाजव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून दोघेही समाजसेवेचे कार्य करतात. विशेषतः समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारांचे योगदान अनन्यसाधारण असून शासनालाही त्याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गोवा राज्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी अधिस्वीकृती पेन्शन योजना, गृहनिर्माण योजना, पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय विमा अशा विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकारांनाही शासनाच्या चौकटीत राहून न्याय देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक डिजिटल भारताचे निर्माते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिजिटल मीडिया क्षेत्राची जाणीव असून ते निश्चितच पत्रकारांना न्याय देतील, असेही सावंत यांनी नमूद केले.

 

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष Raja Mane यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत डिजिटल पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता, पत्रकारांसाठी पेन्शन, शासन जाहिराती, वैद्यकीय विमा, गृहनिर्माण योजना, पत्रकार सुरक्षा आणि कुटुंब कल्याण योजनांचा विस्तार करण्याची मागणी त्यांनी केली.

 

अधिवेशनास गोव्याचे समाजकल्याण मंत्री Subhash Phal Dessai, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री Uday Samant, पणजीचे खासदार Sadanand Shet Tanavade, भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Ram Krishna Vetal, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख Dr. Omprakash Shete यांच्यासह संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत, समन्वयक मुरलीधर चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, शशिकांत देशमुख, सागर चव्हाण, सूर्यकांत वाईकर, धीरज शेळके, भरत केसरकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी घेतली. या मुलाखतीत बदलत्या राजकीय घडामोडी, विकासाच्या दिशा आणि धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.

 

या अधिवेशनास सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष संजय साखरे, सूर्यकांत होनप, सहसचिव तुषार जाधव, कार्यवाह रवींद्र विघ्ने, सदस्य आनंद माळी, अंगद देवकते, अमोल भोसले यांच्यासह देशातील विविध राज्यांतील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या राष्ट्रीय अधिवेशनातून डिजिटल मीडिया पत्रकारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून संघटनेच्या पुढील वाटचालीस नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close