-->
करमाळा

गुळसडी येथील ‘एक बैल एक दुसा मैदानात’ लखन व चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने करमाळा तालुक्यातील गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप फार्म हाऊस येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यामध्ये ३७८ बैलगाडे सहभागी झाले होते.

या भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते व सुभाष आबा गुळवे जिल्हा परिषद सदस्य, प्रशांत पाटील जिल्हा परिषद सदस्य, अण्णासाहेब ढाणे, जिल्हा परिषद सदस्य, योगेश दळवी जिल्हा परिषद सदस्य, ॲड. अजित विघ्ने उपसभापती पंचायत समिती करमाळा, चंद्रकांत काका सरडे सदस्य पंचायत समिती, भरत अवताडे सदस्य पंचायत समिती यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या स्पर्धेसाठी सुमारे ४ लाख रूपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली होती. पहिल्या क्रमांकाचे मानकरी योगेश भगत बारामती व सागर भाऊ थोरात यांचा हिंदकेसरी लखन आणि कुमार कार्तिक शेठ बदलापूर व राजे फार्म संभाजी राजे भोसले मुरूम यांचा चिक्या पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना १ लाख ५५५ रू. बक्षीस मिळाले. हेमंत आबा घोलप पाटील व मोहम्मद अली रीस्क ग्रुप कराड यांचा लाडका राहुल्या व सार्थक विजय पाटील यांचा सर्जा हे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना ८५ हजार ५५५ रू. बक्षीस मिळाले, शिवन्या लक्ष्मण ढेरे देवळाली व मानसी योगेश भंडारे यांचा बलमा व मोईन शेख यांचा मन्याभाई हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना ६५ हजार ५५५ रू चे बक्षीस मिळाले. विजेत्यांना निमगाव के चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे व मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. याव्यतिरिक्त ४ क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रू., पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ आणि नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रूपये अशी बक्षीस देण्यात आली. याबरोबरच सेमी फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्यांसाठी स्वतंत्र बक्षीसे देण्यात आली.

याप्रसंगी बाबाराजे जगताप, मानसिंग खंडागळे, सुजित बागल, गणेश सरडे, सोमनाथ रोकडे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, तानाजी झोळ, रवींद्र वळेकर, गोरख गुळवे, विनय ननवरे, आशिष गायकवाड, राजाभाऊ धांडे, विवेक येवले, नानासाहेब निळ, हनुमंत मांढरे, अमर भांगे, राजकुमार देशमुख, राजेंद्र पवार, तुषार शिंदे, श्रीकांत ढेरे, सुरज ढेरे, योगेश भंडारे, शहाजी झिंजाडे, मयूर पाटील, बालाजी पाटील सतीश बागल, अभिषेक आव्हाड, अशपाक जमादार, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.

३७८ बैलजोड्यांचा सहभाग

          ‘एक बैल एक दुसा’ मैदानात एकूण ३७८ बैलजोड्यांच्या मालकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या पात्रता फेरीत ७ बैलजोड्यांचा एक गट करून ५४ फेऱ्यांतून ५४ जोड्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीत २ जोड्यांचा एक गट करून २७ फेऱ्यांतून २७ जोड्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरल्या. त्यानंतर ३ जोड्यांचा एक गट करून ९ फेऱ्यांतून अंतिम ९ जोड्यांची निवड झाली. शेवटच्या फेरीत या ९ बैलजोड्यांची एकाच फेरीत स्पर्धा घेऊन त्यांना १ ते ९ क्रमांक देण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close