कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)


भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज या महाविद्यालयात दि. १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे वतीने हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. ग्रंथपाल श्री. किशोर हुलगे यांनी उपस्थितांना ग्रंथालयातील उपलब्ध असलेल्या विविध पुस्तकांची माहिती करून दिली. त्याबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनास उपलब्ध करून दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




