-->
राज्यसामाजिक

व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी वाहतूक नियमांची जनजागृती; “अच्छा लगता है फौंडेशन” चा आगळावेगळा उपक्रम

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

 

१४ फेब्रुवारी जगभर साजरा करण्यात येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी वाघोलीतील आव्हाळवाडी फाटा येथे “अच्छा लगता है फौंडेशनच्या” वतीने सेफ्टी विथ लव या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक नियमांची जनजागृती करणारे पोस्टर हातामध्ये धरून त्याचप्रमाणे हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांना व त्याच्या लहान मुलांना गुलाब पुष्प व फुगे वाटण्यात आले. वाहतूक नियम न पाळल्यास थेट यमराजाची भेट होईल तसेच आपल्या साथीदारासाठी व प्रेमासाठी वाहन चालविताना हेल्मेट घालणे गरजेचे आहे असा संदेश यानिमित्ताने उपस्थित तरुणांना दिला.

 

 

 

वाहन चालक महामार्गावर बेफिकीर पणे वाहने चालवीत असल्याने अनेक अपघात होत असतात. त्यात हेल्मेट घातले नसलेल्या अनेकांना या अपघातांमध्ये जीव गमवावा लागतो. त्यामुळे हेल्मेट ही अडचण नसून ती आपली व कुटुंबाची सुरक्षा असल्याचा संदेश या निमित्ताने फाउंडेशन च्या सदस्यांनी दुचाकी वाहन चालकांना दिला. तसेच दुचाकी, चारचाकी व इतर वाहने चालवीत असताना सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. असे आवाहन ही यावेळी “अच्छा लगता है फौंडेशन” च्या सभासदांच्या वतीने करण्यात आले.

 

 

 

या उपक्रमात विक्रम वाघमारे, प्रतिक काळे, चैतन्य पवार, कल्याणी जाडा, तरनदीप सिंघ, शिल्पा करके, सुरज अडागळे, वैभव चव्हाण व यमराजाच्या भुमिकेत बंडु चौरे यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत समाजप्रबोधन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close