सोलापुर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आ. संजयमामा शिंदे यांना मिळावी- ॲड. अजित विघ्ने
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांना बदलले जाण्याची शक्यता वाढली असुन, सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे देण्यात यावी. अशी मागणी करमाळा तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व सामान्यांचे व जाणकारांचेही हेच मत आहे. सोलापुर जिल्ह्यात संजयमामा यांचे नेतृत्व हे एक गतिमान नेतृत्व असुन, नव्या दमाच्या आणि नव्या उमेदीच्या कार्यकर्त्याची पवार साहेब नक्कीच कदर करतील. आमदार संजयमामा शिंदे यांनी आदरणीय पवार साहेबांचे आदेशावरून मागील लोकसभा लढविली. भले पराभव झाला तरी करमाळ्याच्या आखाड्यात पुन्हा नव्या दमाने विधानसभा लढवुन जिंकली. सहाजिकच अस्थिर वातावरणात देखिल संयमाने, चिकाटीने आणि विश्वासाने आमदारकी मिळवली. वस्तुतः यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा उघड पाठींबा देखील त्यांना मिळाला.
आ. शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हाभर केलेली कामे, दांडगा जनसंपर्क, सोलापुर जिल्ह्यातील मामांचा असणारा मित्र परिवार, विविध राजकीय पक्षातील लोकांशी असणारी मैत्री सर्वश्रुत आहे. थोड्याच दिवसात सोलापुर महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. अशा पार्श्वभुमीवर जिल्ह्याला जिल्ह्यातीलच एका नव्या दम्याचा माणूस पालकमंत्री म्हणून आवश्यक आहे. यामुळे जर आमदार संजयमामा यांना पालकमंत्री पद दिल्यास राष्ट्रवादी पक्षाची ताकद तिपटीने वाढ होईल यात शंका नाही. त्यामुळे पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढविणेचे दृष्टीने तसेच आगामी निवडणुका डोळयासमोर ठेऊन आ. संजयमामांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास जिल्हयात नक्कीच ताकद वाढेल. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात असणारी मरगळ दूर होऊन पक्षाची ताकद देखिल वाढेल.
सद्यस्थितीत पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचेमुळे सर्व जिल्हयात राष्ट्रवादीचे विरुध्द लोक बोलत आहेत. वस्तुतः जुन्या पाणी वाटप धोरणातच लाकडी- निंबोडी योजनेला मंजुरी दिलेली आहे. परंतु, सदर योजना कार्यान्वित झाली नाही. या योजने करीता आकडेवारीत तफावत करून इंदापूर तालुक्याला ज्यादा पाणी पळवीण्यासाठी विद्यमान पालकमंत्री प्रयत्नशील असतील तर त्यालाही रोख बसेल. याकरिता सक्षम नेतृत्वाची गरज असुन, आमदार संजयमामा यांचे नेतृत्व सोलापुर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणुन मिळाल्यास पक्ष, संघटना देखिल मजबुत होईल. याकरिता आ. संजयमामांना पालकत्वाची जबाबदारी देण्यात यावी. अशी आमची तमाम कार्यकर्त्यांची मागणी आहे.




