-->
करमाळासामाजिक

बजरंग दलाचा सात दिवसीय शौर्य प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/बाळासाहेब खांडभोर

बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग शिरूर (जि.पुणे) तालुक्यातील फुलगाव येथील नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. हा वर्ग दिनांक १३ मे ते १९ मे २०२२ दरम्यान अनेक बजरंगी प्रशिक्षणार्थी च्या उपस्थितीत संपन्न झाला.

धर्माभिमानी, देशाभिमानी तरुण पिढी घडवण्यासाठीचे कार्य, हिंदु समाजाच्या प्रेरक जाज्वल्य इतिहासाची माहिती, असे विविध माहितीसह ७ दिवस वर्ग चालतो. या वर्गात तरुणांमध्ये शारीरिक महत्व, विविध व्यायामाचे प्रकार जसे सूर्यनमस्कार, मल्लखांब, कराटे, दंड, अडथळा, शर्यत, योगाचे विविध प्रकार शिकवण्यात आले. तरुणांमध्ये संपन्न असे शरीर निर्माणाचे महत्व सांगण्यात आले. विविध प्रकारचे बौद्धिक झाले.

या शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्रीरंग राजे (क्षेत्रीय संघटन मंत्री), अण्णा पंडित (प्रांत संघटन मंत्री), शंकरजी गायकर (क्षेत्र मंत्री), विवेक कुलकर्णी (क्षेत्र संयोजक), लहू धोत्रे (प्रांत संयोजक) यांच्या हस्ते झाले. वर्गाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

या शौर्य प्रशिक्षण वर्गात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १६० पेक्षा अधिक बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.

राष्ट्रभिमानी, धर्मभिमानी पिढी घडविण्यासाठी तरुणांनी बजरंग दलाचे सक्रिय सदस्य व्हावे. असे आवाहन पुणे विभागाचे संयोजक श्री. संदेश भेगडे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close