-->
क्रीडाविशेष

सोलापूर जिल्हा संघाकडून खेळताना अकलूजच्या तन्मय साठेचे शानदार शतक

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

सोलापूर येथे पार्क मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत १६ वर्ष वयोगटाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाकडून खेळताना अकलूजच्या तन्मय मंगेश साठे याने आपले वैयक्तिक शतक पूर्ण केले. त्याने रत्नागिरी जिल्हा संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात सुरेख फलंदाजी करत शानदार शतक पूर्ण केले.

 

९ व्या क्रमांकाला फलंदाजीला येऊन तन्मयने १५ चौकार व एका षट्काराच्या मदतीने १०१ धावांची नेत्र दीपक फलंदाजी केली. तन्मय साठे हा अकलूज येथील शिवरत्न क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षक मंजित नवले सर व बाळासाहेब रणनवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ग्रामीण भागातील या खेळाडूच्या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

सोलापूर जिल्हा क्रिकेट असिएशनचे चेअरमन मा. श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य अनिल जाधव सर व डॉ. महेश ढेंबरे सर या सर्वांनी तन्मय चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close