दुष्काळ निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा- गणेश इंगळे
अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा युवासेनेचे गणेश इंगळे यांचा ईशारा

माय मराठी न्यूज नेटवर्क


दुष्काळ निधी तात्काळ मिळावा, या मागणीसाठी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळॆ व युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके यांच्या वतीने माळशिरस चे तहसीलदार सुरेश शेजूल यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खातेवर तात्काळ दुष्काळ निधी जमा न केल्यास युवा सेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल असा ईशारा ही युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.
माळशिरस तालुका हा दुष्काळ ग्रस्त जाहीर आहे. शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ निधी जाहीर करून बरेच महिने उलटून गेलेले आहेत. परंतु काही थोड्या फारच शेतकऱ्यांच्या खातेवर दुष्काळ निधी जमा झाला आहे. अनेक शेतकरी दुष्काळ निधी पासून वंचित आहेत. काही ठिकाणी गावचे गाव दुष्काळ निधी पासून वंचित आहेत.
यावेळी सचिन पराडे पाटील, विक्रम गाडगे, दादासाहेब आवारे, सागर तांबडे, मधुकर आदी शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



