-->
Uncategorized

कृषी निविष्ठा तालुका अध्यक्षपदी महेश चिवटे यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका खते बियाणे आणि कीटकनाशके असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी महेश ऍग्रो एजन्सी चे संचालक महेश चिवटे यांची बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी करमाळा तालुक्यातील २७० खत विक्रेते बैठकीसाठी उपस्थित होते.

यावेळी ईतर निवडीही करण्यात आल्या असून यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी करमाळा विभाग प्रशांत नेटके, जेऊर विभाग प्रताप जाधव, पारेवाडी विभाग निलेश खानवरे, कोर्टी विभाग सागर हुलगे, केम-कंदर विभाग दादा कामटे, साडे विभाग हनुमंत सावंत, जिंती विभाग जाकीर मुलानी, खजिनदार ऋषभ गादिया, सह खजिनदार कृष्णा सरडे तर सचिवपदी रोहित दोशी जेऊर यांची निवड करण्यात आली.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहणार असून नूतन अध्यक्ष महेश चिवटे हे सोलापूर बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून करमाळा एमआयडीसीचे चेअरमन आहेत. तसेच करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close