कामोणेच्या उपसरपंचपदी आश्विनी नलवडे यांची बिनविरोध निवड

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


कामोणे, (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. अश्विनी संतोष नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात असून त्यांचा सत्कार रूपाली पंकज नलवडे यांनी केला. सुहास जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रमेश राजाराम खरात यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
नूतन उपसरपंच आश्विनी नलवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी ग्रामसेवक प्रवीण साबळे यांनी आश्विनी नलवडे यांची नवीन उपसरपंच म्हणून निवड झाली असल्याचे जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास जाधव, रूपाली पंकज नलवडे, शोभा महेंद्र भालेराव, सारिका बाळू शिंदे, संजय साहेबराव भिसे, गणेश सहदेव शिंदे तसेच पोलीस पाटील प्रदीप रामराव पाटील यांच्यासह नानासाहेब नलवडे, महारुद्र जाधव, औदुंबर नलवडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.



