फार्मर्स कृषी आधार प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालकपदी रऊफ मुलाणी यांची निवड

प्रतिनिधी/अलीम शेख


ठाणे येथील फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेड (प) च्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दि. १९ ऑक्टोंबर रोजी पार पडली. या बैठकीमध्ये फार्मर्स कृषी आधार प्रायव्हेट लिमिटेडचे चेरमन श्री. इरशाद शेख यांनी व कंपनीचे सर्व संचालक मंडळाकडून श्री. रऊफ मुलाणी यांची एक मताने व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संचालक जेष्ठ विधी तज्ञ श्री गोविंदरावजी संकपाळ साहेब, संचालक ॲड. श्री. एम एम शेख साहेब, मुंबई महापालिकाचे अधिकारी श्री. प्रदीप कदम साहेब, डिझास्टर मॅनेजमेंट गव्हरमेन्ट ऑफ इंडिया चे संचालक श्री. हेमंतजी नागरेकर साहेब, उद्योगपती श्री. रवी मेणत साहेब, जेष्ठ विमा प्रतिनिधी लेखापाल श्री. रहीम शेख साहेब व श्री. नारायण केणी साहेब उपस्थित होते.
श्री. रऊफ मुलाणी हे करमाळा येथील पुण्य नगरी चे प्रतिनिधी श्री. अलीम शेख यांचे भाचे तर श्री. एम एम शेख, श्री. इरशाद शेख व श्री. रऊफ मुलाणी हे आवाटी येथील माजी सरपंच कै. दाऊदखॉ पठाण यांचे नातू आहेत.




