-->
आरोग्यकरमाळा

वाशिंबेत आयुष्यमान भव: मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी व आभा कार्ड शिबीर संपन्न

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे आयुष्यमान भव: मोहिमे अंतर्गत लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी व आभा कार्ड काडून वाटप करण्याचे शिबीर ग्रामपंचायतीच्या वतीने आज बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन वाशिंबे गावाचे सरपंच तानाजी (बापू) झोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या प्रसंगी त्यांनी आयुष्यमान भव: मोहिमे अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेची माहीती उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार केंद्र सरकार मोफत करणार आहे. याचा लाभ आपल्या गावातील गरजूनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच अमोल पवार, माजी सरपंच प्रताप झोळ, बापूसाहेब गाडे, नामदेव बोबडे, आदाम शेख, प्रदीप राऊत, अमोल भोंग, रमेश सपकाळ, उद्दव बोबडे, आरोग्य सेवक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close