
प्रतिनिधी /ऋषिकेश चव्हाण


हिवरे ता करमाळा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शिवजंयती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंभुराजे फरतडे उपसरपंच दिलीप फरतडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे ,माजी सरपंच बापु फरतडे,माजी ग्रामपंचायत सदस्य अमोलदादा फरतडे, नितिन मगर, मुख्याध्यापक सुग्रीव नीळ, सहशिकक्षक निळकंठ हनपुडे, सुरेश शिंदे, लहू चेंडगे, शिवाजी खरात, सतिश सुर्यवंशी, पल्लवी कुलकर्णी मॅडम, जालिंदर हराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धे मध्ये २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .या स्पर्धकांमधून लहान गट व मोठा गट प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना बक्षीस म्हणून वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील मनोबल वाढवण्यासाठी वही भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ६ वी ची विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा तुकाराम फरतडे हिने केले.
यावेळी विश्वंभर फरतडे , अंकुश माने, विनोद पाटील, विश्वंभर फरतडे, मनोज फरतडे, अशोक महाडिक, दिपक लावंड ,दिनेश पाटील, हणुमंत डौले,मच्छिंद्र लोखंडे, उपस्थित होते.




