ईगल लीप स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


विद्यानगर (तालुका करमाळा) येथील ईगल लीप स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व दहीहंडी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आपला सहभाग दर्शविला.
या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी कृष्णा, राधा, गोपिका अशी वेशभूषा परिधान करून बाळ गोपाळ यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. दहीहंडी हा वर्षातला असा एकच दिवस जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जायला प्रमाणिकपणे मदत करतो. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्याने व सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणारा संदेश यावेळी बालचमुंनी दहीहंडी मार्फत दिला.
यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद फंड सर, ईगल लीपचे अध्यक्ष महेश दिवेकर सर, उपाध्यक्ष विजय बागल, सदस्य पोपट धुमाळ, मुख्याध्यापिका स्वप्नाली दिवेकर, विभाग प्रमुख सचिन पाटील, प्रीती मिस, कोमल मिस, सिद्धी मिस, सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.




