
माय मराठी न्यूज नेटवर्क


पुणे जिल्ह्यामध्ये वन अर्थ सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून सौ. वैजयंता महेश गजरे, श्री. महेश गजरे, वाघोलीच्या सौ. अर्चना ताई गाडे व श्री रघुनाथ गाडे यांनी “मायेची ऊब” या उपक्रमांतर्गत आज रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी ऊसतोड मजुर महिला व कामगारांना कपडे वाटप केले.
शहरी भागातील मुलांना ऊसतोड मजुरांच्या जीवनाचे वास्तविक दर्शन घडावे व मॅाल मध्ये मिळणारी साखर किती कष्टातून तयार होते याची प्रत्यक्षदर्शी जाणीव व्हावी. यासाठी अर्चनाताईंनी, ज्ञानेश्वरी व सई या दुसरी आणि पाचवीत शिक्षण घेणार्या आपल्या मुलींना देखील सोबत आणले होते. आदेशने त्यांना ऊसतोड मजुरांच्या झोपड्या दाखविल्या व त्यांच्या मुलांना या लहानग्यांनी खावू वाटला. दरवर्षी फाऊंडेशन च्या माध्यमातून कपडे वाटप होत असते. आर्चनाताईंनी सहकुटुंब येवून हे कार्य केले व त्या भारावून गेल्या.
अजूनही बरेचसे मजूर कपडांच्या प्रतिक्षेत आहेत. तरी पुणेकरांना विनंती आहे की तुम्ही देखील या उपक्रमांत मदत करावी हि नम्र विनंती.




