-->
करमाळासामाजिक

राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्त्व देणार असून सामाजिक कामात अग्रेसर राहणार- राजेंद्र बारकुंड

 

करमाळा प्रतिनिधी

समाजाची सेवा करणे व समाजातील दुर्लक्षित घटकाच्या मदतीला धावून जाणे हेच आता जीवनाचे उद्दिष्ट असून इथून पुढील काळात समाजसेवेला प्राधान्य देणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राजेंद्र बारकुंड यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादा थोरात, शिवसेना डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कारंडे, करमाळा शिवसेना उपशहर प्रमुख नागेश गुरव, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजेंद्र बारकुंड यांनी दरवर्षी चिकलठाण परिसरातून शैक्षणिक गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना उसाच्या तोडणीसाठी अनेक कारखान्याशी चांगले संबंध ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देतात. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम पाहत असताना त्यांच्या हातून संपूर्ण तालुक्यात विकासकामे झालेली आहेत. आज दिवसभर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी गर्दी केली होती.

या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, आता इथून पुढे राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्व देणार असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close