तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन करमाळा तालुक्यातील कविटगाव येथे गुरूवार दि. ०१ सप्टेंबर २०२२ ते ०२ सप्टेंबर २०२२ दरम्यान भरवण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम या शाळेने आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये उत्तरेश्वर हायस्कूल केम या विद्यालयाने इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी ओंकार त्रिंबक भिल्ल याने बोरवेल मशीन हे उपकरण सादर केले. त्यास विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. कुंभार सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम एस.बी. सर, पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन समिती, केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




