पारेवाडी रेल्वे स्टेशनसह परिसरातील प्रश्नांबाबत खा. रणजितसिंह निंबाळकर यांना निवेदन

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा. या मागणीसह पश्चिम भागातील अनेक महत्वपुर्ण विकास कामांच्या संदर्भात केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, हिंगणीचे सरपंच हनुमंत पाटील व शिष्टमंडळाने आज (दि. ०१) रोजी करमाळा येथे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार. श्री. रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे दोन दिवसाच्या करमाळा तालुका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ॲड. अजित विघ्ने, हनुमंत पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने खा. निंबाळकर यांची भेट घेऊन आपल्या भागातील विविध प्रश्न व समस्याबाबत निवेदन दिले. याप्रसंगी खासदारांनी आपले विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपाचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेशजी चिवटे, युवा नेते शंभुराजे जगताप, करमाळा शहर अध्यक्ष जगदीश आग्रवाल, दिपक चव्हाण व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.




