प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- आ. संजयमामा शिंदे
माजी आमदार नारायण पाटील यांचे चुलत बंधू अनिल पाटील यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


कार्यकर्त्यांना दिलेला शब्द खाली पडू न देता अपेक्षेप्रमाणे काम करणार असून, शिंदे गटात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांना ताकद देणार असून, कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी जेऊर येथील प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आयोजित जाहीर सभेमध्ये केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सिना माढा योजनेप्रमाणे दहीगांव ची योजना चालवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार आहे. सीना माढा योजना आणि दहिगाव योजना दोन्ही योजना १९९५ साली मंजूर झाल्या असल्या तरीही दहिगाव योजना खूप रेंगाळली आहे. ही योजना गतिमान करण्यावर आपला भर राहणार आहे. जेऊर येथे सोमवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत आमदार संजयमामा शिंदे बोलत होते.
यावेळी भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य अनिल पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आमदार संजयमामा शिंदे गटात जाहिर प्रवेश केला. या कार्यक्रमापूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांची जेऊर गावातून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी निमगाव (टें) चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, लव्हे चे सरपंच विलास पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, शिवसेनेचे सुर्यकांत पाटील, संचालक दादासाहेब लबडे, दुध संघाचे संचालक अशोक पाटील, माजी संचालक राजेंद्र धांडे, ॲड. जालींदर बसळे, माजी जि. प. सदस्य उध्दव माळी, राजेंद्र बारकुंड, वामनराव बदे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव, बालाजी गावडे, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, स्वप्नील पाटील, भास्कर भांगे, अमर भांगे, गौतम ढाणे, युवराज गपाट, रवींद्र वळेकर, भोजराज सुरवसे, सरपंच उदय ढेरे, डॉ. विकास वीर, प्रविण शिंदे, बाळासाहेब जगदाळे, सुहास रोकडे, मानसिंग खंडागळे, सोमनाथ रोकडे, अशोक तकीक, डॉ. गोरख गुळवे, तात्या पाटील, अशपाक जमादार, शंभू बोराटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर गादिया यांनी केले. यावेळी लव्हे चे सरपंच विलास पाटील, ॲड. सविता शिंदे, चंद्रहास निमगिरे, अनिल फाटके, उमेश पाथ्रुडकर, अभयकुमार लुंकड, ॲड. अजित विघ्ने, राजेंद्र बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विलास दौलतोडे यांनी केले.




