-->
करमाळाराजकिय

मांगी सोसायटी निवडणुकीत सुजीत बागल यांचा अर्ज मंजूर; माजी आमदार बागल गटाला जबरदस्त धक्का

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

मांगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत छानणी प्रक्रियेत अवैध ठरविणेत आलेला आमदार संजयमामा शिंदे समर्थक, ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल व सौ. अश्विनी बागल यांचा अर्ज अपीलात सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी वैध ठरवित उमेदवारांच्या यादीत बागल यांचे नाव समाविष्ट करणेचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे माजी आमदार बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. प्रथम माजी आमदार शामलताई बागल यांचा अर्ज बाद होणे व आता सुजीत बागल यांचा अर्ज मंजूर होणे हा दुसरा मोठा धक्का बागल गटाला बसला आहे.

 

 

या निवडणुकीच्या छानणीत अगोदरच माजी आमदार शामलताई बागल यांचा अर्ज थकबाकी मुळे बाद झाला होता. त्यावेळी बागल गटाकडुन ही सुजीत बागल व अश्विनी बागल यांचे अर्जावर ते जयवंत मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीचे थकबाकीदार असल्याने हरकत घेण्यात आली होती. त्यामधे सुजीत व अश्विनी बागल यांचे अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी बाद केले होते. या निर्णयाचे विरोधात या उभयतांनी सहाय्यक निबंधक सह. संस्था करमाळा यांचेकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत अपील दाखल केले होते.

 

 

या अपिलाच्या लेखी म्हणणे व तोंडी सुनावणीव्दारे ॲड. वीर यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीज अँक्ट नुसार नोंदणी झालेल्या संस्थांचे थकबाकीचा मुद्दा गैरलागू असल्याचे कायद्यातील तरतुदी व काही न्याय निवाड्यांव्दारे दाखवून दिले. तसेच जयवंत मल्टिस्टेटची थकबाकी देखील छानणी प्रक्रियेच्या विहीत मुदतीत जमा करून ना हरकत दाखला दाखल केलेचे स्पष्ट केले. दोन्ही बाजुंचे लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकले. नंतर सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी अपील अर्ज मंजुर करीत वैध उमेदवाराच्या यादीमधे अश्विनी व सुजीत बागल यांची नावे समाविष्ठ करण्याचा लेखी आदेश दिला. यामध्ये सुजीत बागल व अश्विनी बागल यांचेवतीने ॲड. कमलाकर वीर व तक्रारदारांच्या वतीने ॲड. नानासो शिंदे यांनी काम पाहीले.

 

हा तर सत्याचा विजय- सुजीत (तात्या) बागल

यावर प्रतिक्रिया देताना सुजीत बागल यांनी हा सत्याचा विजय असल्याचे सांगीतले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा अर्ज बाद करणेसाठी बागल गटाने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु सोसायटी, ग्रामपंचायत व एकूणच राजकीय -सामाजीक जीवनात आपण शुद्ध विचाराने व नियतीने काम केले तर विजय सत्याचाच होतो, हे या निर्णयाने दाखवून दिले. सत्याने वागणाराला त्रास होतो, परंतु अंतिमतः विजय हा सत्याचाच होतो.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close