प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


लोहगाव आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वडगाव शिंदे – काकडे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत तब्बल ४०५ शून्य ते पाच वयोगटातील लहान बाळांचे लसीकरण पार पडले असल्याची माहिती सरपंच हेमलता विलास शिंदे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली मांगले यांनी दिली.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत वडगाव शिंदे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यासाठी मोठी जनजागृती केली होती. ग्रामीण भाग व मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असल्याने गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील कोणतेही बाळ या पोलिओ लसीकरणात मागे राहणार नाही याची काळजी घेतली. यासाठी सोशल मीडियावर जनजागृती करण्यात आली. विद्यमान सरपंच हेमलता शिंदे व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आजी – माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावातील युवा वर्गाने यासाठी परिश्रम घेतले.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नागसेन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली मांगले, आरोग्यसेविका पुष्पावती कलकोटे, आशा सेविका रेखा मानकर, ललिता गायकवाड आदींनी नियोजन व व्यवस्थापन केले.




