-->
करमाळासामाजिक

महाशिवरात्रीला आदिनाथ कारखान्यावर बैठक; कर्मचारी, ऊसउत्पादकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने महाशिवरात्रीला मंगळवारी सकाळी ११:०० वाजता आदिनाथ कारखान्याच्या मंदिरावर ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहान आदिनाथ कारखाना बचाव समितीने केले आहे.

या बैठकीसाठी आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, धुळा भाऊ कोकरे, डॉ. वसंत पुंडे, महेंद्र पाटील, डॉ. अमोल घाडगे, उदयसिंह मोरे पाटील, कर्मचारी अध्यक्ष अभिमन्यू देशमुख, प्राध्यापक शहाजीराव देशमुख, प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, महेश चिवटे, देवानंद बागल, रवींद्र गोडगे, अण्णा सुपनर, सुदर्शन शेळके, शिवशंकर जगदाळे, अजय बागल या सर्वच बचाव समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना संदर्भात आपले विचार मांडण्यासाठी सभासदांनी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close