करमाळ्यात शिव संपर्क मोहीम केवळ


कागदावरच
करमाळा (प्रतिनिधी) शिवसेनेची शिव संपर्क मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात जोरदारपणे सुरू असताना करमाळा शहर व तालुक्यात मात्र केवळ प्रसिद्धीचा स्टंट करून कागदावरच शिव संपर्क मोहीम राबवली जात आहे शिवसेनेतील गटबाजीच्या राजकारणामुळे शिव संपर्क मोहीम योजना करमाळा तालुक्यात सपशेल फेल ठरली आहे हजारो नवतरुण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाला मान्यता देत शिवसेनेत प्रवेश करून काम करण्याची इच्छा व्यक्त करत असताना अशा नवतरुणांना शिवसेनेचे नोंदणी फॉर्म मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे 2019 च्या निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी वेगळ्या वेगळ्या गटात विखुरले गेले नेमका पदाधिकारी कोण व निर्णय कोणी घ्यायचा याचा मेळ खुद्द जिल्हाप्रमुख काला लागत नसल्यामुळे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे सुद्धा करमाळा बाबतीत ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील सुद्धा शिवसेनेचे काम करत असल्याचा दावा करत असून वारंवार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते अनिल देसाई
उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून आहेत दुसरीकडे रश्मी बागल सुद्धा अधून मधून शिवसेनेच्या मंत्र्यांना भेटून आपण शिवसेनेत असल्याचा दाखला देत आहे दुसरीकडे विद्यमान पदाधिकारी मध्ये प्रचंड गटबाजीचे असून याचा परिणाम शिव संपर्क मोहिमेवर झाला आहे आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची छबी लोकांच्या मनात घर करत असून सर्वसामान्य आतून जनता शिवसेनेकडे आकर्षित होत आहे करमाळ्यात मात्र या संधीचा फायदा शिवसेनेला घेता येत नाही शिव संपर्क मोहिमेचा कागदी फार्स करून वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध करून पक्ष कार्याच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न पदाधिकारी करत आहेत शिव संपर्क मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शिवसैनिक जाऊन त्याने सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घेऊन पक्षाची भूमिका शासनाचा योजना तळागाळात पोचवण्यासाठी ही शिव संपर्क मोहीम सुरू आहे शिवाय या संपर्क मोहिमेच्या माध्यमातून कोणता पदाधिकारी सक्षम आहे व आगामी काळात कोणाच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी द्यायची याचा निर्णय शिवसेना भवन मधून होणार असल्याची चर्चा आहे मात्र शिवसेना सभासद नोंदणी फार्म व शिव संपर्क मोहिमेचे फार्म सर्वसामान्य तळागाळापर्यंत काम करणाऱ्या शिवसैनिकांना पर्यंत पोहोचत नसल्यामुळे हे फॉर्म नेमके गहाळ कोठे झाले याची कुजबूज शिवसैनिकांत सुरू आहे याबाबतीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कोणीही या विषयावर बोलण्यास तयार नाही आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका असा महत्वाचा निवडणूक असताना केवळ दुसरे कोणी शिवसेनेत येऊ नये दुसरे नवीन कार्यकर्ते नेते आले तर आपले महत्त्व कमी होईल ही भावना शिवसेना पक्षाची वाढ खुंटणे यास कारणीभूत ठरत आहेत यामुळे आता सर्व वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून नवीन कार्यकर्त्यांना पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी तळागाळातील शिवसैनिक आतून होत आहे या सर्व वादाचा फायदा करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घेत असल्याचे दिसून येत असून सत्तेचा पूर्णपणे वापर सर्व शासकीय अधिकाऱ्यांवर वर्चस्व सर्व विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व काम वाटप टेंडर या थी राष्ट्रवादीची सरशी दिसते एकंदरीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या दुर्लक्षामुळे करमाळ्यातील शिवसेना दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे सध्यातरी करमाळ्यातील शिवसेना ठराविक लोकांची वर्षानुवर्षे मक्तेदारी बनली आहे
महेश चिवटे शिवसेना उपजिल्हाप्रमुख
वरिष्ठांच्या आदेशानुसार सैनिक काम करत असून लवकरच जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पक्ष संघटनेचे कामास सुरुवात करण्यात येणार आहे
विशाल गायकवाड युवा सेना शहर प्रमुख
शिवसंपर्क मोहीम संदर्भात आम्हाला कोणत्याही सूचना अद्याप आलेल्या नाहीत किंवा वरिष्ठांनी कोणतेही फॉर्म दिलेले नाही
संजय शीलवंत मा शहर प्रमुख शिवसेना
सर्व जुन्या शिवसैनिक व जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही वर्षानुवर्षे ठराविक घरातच शिवसेनेची पदे असल्यामुळे शिवसेनेची वाढ खुंटली आहे




