-->
आरोग्यसामाजिक

आमदार अशोकबापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव भीमामध्ये नेत्र तपासणी शिबीर

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

शिरूर – हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांचे सामाजिक काम हे कौतुकास्पद असुन कोरोना काळात ही विकासकामांची गंगा मतदार संघाच्या प्रत्येक गावात नेण्याचे काम आमदारांनी केले असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी दिली. शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाताभाभी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, मोहम्मदवाडी (हडपसर) यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका उपाध्यक्ष रवींद्र फडतरे, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा गणेश फडतरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, तालुका संघटक बबुशा ढेरंगे, मंगल कुलकर्णी, विक्रम दौंडकर, शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशीद, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, आशा प्रदीप काशीद, शालेय शिक्षण समीतीचे माजी अध्यक्ष बापू शिंदे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिता कांबळे, संपत गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, विक्रम गव्हाणे, वंदना गव्हाणे, मनीषा गव्हाणे, रेखा ढेरंगे, अर्चना सुपेकर, शिल्पा फडतरे, जयश्री गव्हाणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन आदी भागातून अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत उपस्थित होते. देसाई हॉस्पिटल च्या वतीने डॉ. संदीप थिटे, अविनाश आडके यांनी आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी केली. याचे संयोजन नितीन वाघमारे, विकास वाघमारे यांनी तर नियोजन व व्यवस्थापन राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका उपाध्यक्ष रवींद्र फडतरे तसेच ग्रामपंचायत च्या वतीने आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंदणी बरोबर इतर मदत सागर गव्हाणे, नीलिमा माकर, आनंदा पवार, रमेश कुमार यांनी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close