-->
विशेषसामाजिक

कोरेगाव भीमा येथे ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम

 

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे पुणे जिल्हा परिषद, शिरूर पंचायत समिती व कोरेगाव भीमा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता व महाश्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत गावातील मारुती मंदिर, ग्रामपंचायत इमारत परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पुणे नगर रोड लगत असणाऱ्या बाजार मैदानाच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.

 

फक्त एक दिवस स्वच्छता न करता नागरिकांनी आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवला तर गाव सुंदर होण्याच्या बरोबरच आपले आरोग्य देखील विविध रोगांपासून दूर राहील असे प्रतिपादन यावेळी सरपंच अमोल गव्हाणे पाटील यांनी केले.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, वंदना गव्हाणे, सविता घावटे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, स्वच्छता कर्मचारी गुलाब पवार, सागर गव्हाणे, विनोद दौंडकर, आनंदा पवार, तिरसिंग नानगुडे, वैशाली कडलक, जनाबाई गवदे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close