-->
करमाळाराज्यविशेष

खा.शरद पवार यांचे उपस्थित कुकडी संदर्भात बैठक; मांगी तलावाबाबत ही झाली चर्चा

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

आज दिनांक १६/०९/२०२१ रोजी मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प समूहाच्या सिंचन अडचणी व त्यावरील उपाय योजना यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुकडी प्रकल्प समूहाच्या येडगाव, वडूज, पिंपळगाव जोगे, डिंबे, माणिकडोह या प्रकल्पाच्या सिंचन अडचणी व नव्याने पाणी उपलब्ध करण्यासाठी व घाटावरील पाणी वळवून ह्या प्रकल्पामध्ये पाण्याची वाढ करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

तसेच डिंबे ते माणिकडोह या महत्त्वपूर्ण बोगद्याच्या कामासाठी केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिलेली आहे. राज्यातील तांत्रिक सल्लागार समितीची बैठका या विषयावरती झालेल्या आहेत. परंतु हा विषय अद्यापही प्रलंबित आहे. हा बोगदा झाल्यास पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या महत्वपूर्ण विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्पातून मांगी तलावामध्ये जास्तीत जास्त पाणी येण्यासाठी व तेथील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यावर अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या व पुढील बैठकीमध्ये अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेब, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, आमदार संजयमामा शिंदे, आमदार रोहित दादा पवार, आमदार अशोक बापू पवार, आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके, जलसंपदा प्रधान सचिव विजय गौतम, कृष्णा खोरे कार्यकारी संचालक विलास राजपूत, कुकडी मुख्य अभियंता धुमाळ साहेब आदीजण उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close