-->
देश

‘या’ कारणासाठी बेडकांचे लावले थाटामाटात लग्न; तर लग्नात जेवली १००० वऱ्हाडी

 

माय मराठी न्युज नेटवर्क

छत्तीसगड या राज्याची राजधानी रायगड जिल्ह्यातील लैलुंगा ब्लॉक मधील बेस्किमुडा या छोट्याशा गावात नर बेडूक आणि मादी बेडकाचे लग्न पूर्ण रीतिरिवाजाने करण्यात आले. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये दोन बेडकांचे लग्न पार पडले. हिंदू विवाह परंपरेने शनिवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी हे अनोखे लग्न झाले. या खास लग्नासाठी वधू आणि वराच्या बाजूचे १००० हून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते.

या लग्नात सर्व लोक नाचले, गायले आणि जेवणही केले. मंत्राच्या जपाने पंडितांनी विवाह सोहळ्याची सांगता केली. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. छत्तीसगडच्या ग्रामीण भागात अशी धारणा आहे की, जर दोन बेडकांचे लग्न लावले तर आपल्या भागात चांगला पाऊस पडतो. याच विश्वासाखातर नर बेडूक आणि मादी बेडकाचा विवाह पूर्ण रितीरिवाजाने लावण्यात आला. हिंदू परंपरेत जसे लग्न होते, त्याच विधींसह हा विवाह सोहळा पूर्ण थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे या खास लग्नाच्या आमंत्रणासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या.

लग्नात सामील झालेले या भागातील भाजयुमो नेते कृष्णा जयस्वाल यांनी सांगितले की, सोनाजोरी गावातील संपूर्ण ग्रामस्थ वर पक्षाच्या बाजूने बेस्किमुडा मध्ये लग्नाच्या मंडपात हजर झाले. गायन, वादनासह लोकांनी नृत्यही केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close