-->
करमाळासामाजिक

सरपडोह येथील दाम्पत्याने गौरी गणपतीच्या रूपाने केलेल्या अनोख्या देखाव्यात दिले ‘हे’ संदेश

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील श्री. अरुण चौगुले व त्यांच्या पत्नी सौ. रेणुका चौगुले यांनी ऑनलाइन शिक्षणाचा देखावा गौरीच्या रूपाने तयार केला आहे. त्याचबरोबर आरोग्याचा संदेश म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश केला पाहिजे. सेंद्रीय पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत असा संदेश या गौरी गणपती मधून देण्यात आलेला आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील मुलांना पालकांना सुद्धा आता लवकर शाळा सुरू व्हाव्यात असे वाटत असल्याचे चित्रही या गौरी-गणपती च्या देखाव्या मधून दाखवण्यात आलेले आहे.

 

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रात ऑनलाइन शिक्षण चालू आहे आणि या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांची होणारी धावपळ, पालकांची होणारी धावपळ, मुलांची होणारी धावपळ, मोबाईल समस्या, नेटवर्क समस्या अश्या अनेक समस्या आहेत. परंतु तरीही सध्या तरी ऑनलाइन शिक्षणा शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. या विषयी देखावा गौरी गणपती मधून दाखवण्यात आला आहे.

हा देखावा उभा करण्यासाठी सौ. रेणुका चौगुले यांची मुलगी आदिती चौगुले, मुलगा यशराज चौगुले, सासुबाई अलका चौगुले आणि अरुण चौगुले यांनी मदत केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close